माजी आमदाराची नववर्षांच्या पार्टीत फायरिंग, महिलेच्या डोक्याला लागली गोळी

firing
नवी दिल्ली – नववर्षाच्या निमित्ताने फतेहपूरबेरी येथील जेडीयूचा माजी आमदार राजू सिंहने त्यांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत फायरिंग केल्याची घटना घडली आहे. त्याने यावेळी एक, दोन नाही तर तब्बल तीन राउंड फायर केले. पार्टीत सहभागी झालेला त्यांचा मित्र विकास गुप्ता यांची पत्नी अर्चना यांच्या डोक्याला यात गोळी लागली असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

वसंत कुंज येथील फोर्टिज रुग्णालयात अर्चना यांना दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. राजू सिंह बिहारमधून जेडीयूचा माजी आमदार आहेत. २०१० मध्ये ते निवडून आले होते. यानंतर २०१५ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर ते निवडणुकीत पराभूत झाले होते.

फतेहपूरबेरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. राजू सिंहला रात्री उशिरापर्यंत आरोपी अटक करण्यात आलेली नव्हती. राजू सिंह घटनेनंतर फरार असल्याचे समजते. जखमी महिलेचे नाव अर्चना (४२) असे आहे. तिचा पती विकास गुप्ता हा राजू सिंहचा मित्र असून स्वतः अर्चना या आर्किटेक्ट आहेत, अशी माहिती साऊथ जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त विजय सिंह यांनी दिली आहे. याप्रकरणी अर्चानाचे पती विकास गुप्ता यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Leave a Comment