फ्लिपकार्टच्या सचिन बन्सल यांनी भरला 699 कोटी अग्रिम कर

sachin-bansal
मुंबई: आयकर विभागाकडे 699 कोटी रुपयांचा ‘अग्रिम कर’चा भरणा फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल यांनी केला आहे. नुकतीच फ्लिपकार्टची अमेरिकी कंपनी वॉलमार्टला विक्री केल्यामुळे झालेल्या भांडवली उत्पन्नाच्या नफ्यावर हा ‘अग्रिम कर’ भरला आहे. पण वॉलमार्टशी केलेल्या व्यवहारातून फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांना किती फायदा झाला ते अद्याप त्यांनी सांगितले नाही. आयकर विभागाने नोटिशीद्वारे किती नफा झाला याची फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि माजी सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांना विचारणा केली होती.

या संदर्भात एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाकडून वॉलमार्टलाही याबाबद्दल विचारणा करण्यात आली होती. परदेशी भागधारकांनी मिळवलेल्या नफ्यावरील कर भरला जात असल्याची खात्री करावी असे सांगण्यात आले होते. गेल्या वर्षी 7,440 कोटी रुपयांचा कर वॉलमार्टने भरला होता. सिंगापूरमध्ये फ्लिपकार्टची नोंदणी करण्यात आली होती. शिवाय सॉफ्टबँक आणि ईबे हे कंपनीचे मोठे भागधारक होते.

Leave a Comment