ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदी जॅर बोल्सनारो विराजमान

Jair-Bolsonaro
रियो डी जेनेरो – ब्राझीलच्या नव्या राष्ट्राध्यक्ष पदाची काँग्रेसचे नेते जॅर बोल्सनारो यांनी शपथ घेतली. मी भेदभाव किंवा विभाजन न करता एक नवा समाज घडवण्यासाठी काम करेल, असे ते यावेळी म्हणाले. डावे पक्षाच्या फर्नाडो हदाद यांच्या विरोधात जॅर बोल्सनारो यांनी विजय मिळवला.

मी ब्राझीलच्या सार्वत्रिक विकासाच्या दृष्टीने काम करेल. भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देईल, असे ते नागरिकांना संबोधताना म्हणाले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पेयो, इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, हंगेरियन पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बान आणि पोर्तुगीजचे अध्यक्ष मार्सेलो रीबेलो डी सोसा यांच्यासह अनेक देशाचे राजदुत त्यांच्या शपथविधीवेळी उपस्थित होते. ते राजकारणात येण्याआधी सैन्य दलात होते.

Leave a Comment