अब्जाधीश प्रियकराशी अभिनेत्री अॅमी जॅक्सनने केला साखरपुडा

amy-jackson
नववर्षांच्या सुरूवातीलाच ब्रिटीश ब्युटी म्हणून ओळखल्या जाण्याऱ्या अॅमी जॅक्सनने तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. प्रियकर जॉर्ज पानायिटूसोबत अॅमी जॅक्सनने साखरपुडा केला आहे. आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही खुशखबर दिली आहे. तिने ‘2.0’, ‘सिंग इज ब्लिंग’ आणि अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे.

ब्रिटीश प्रॉपर्टी डेव्हलपर अँड्रस पानायिटूचा जॉर्ज मुलगा आहे. त्याचबरोबर जॉर्जच्या मालकीची हिल्टॉन, डबल ट्री, पार्क प्लाझा यासारखी अनेक आलिशान हॉटेल्स आहेत. जॉर्जला एक भाऊ आणि तीन सावत्र बहिणी आहेत. तो अॅबिलीटी ग्रुपचा संस्थापक असून तो वयाच्या १६ वर्षी या ग्रुपमध्ये सहभागी झाला होता. ४०० मिलिअन पाऊंड एवढी ज़ॉर्जच्या वडिलांची संपत्ती ही असल्याचे म्हटले जात आहे. अनेक आलिशान आणि जगातील सर्वात महागड्या गाड्या देखील जॉर्जकडे आहे. अॅमीला डेट करण्याआधी जॉर्जचे नाव अनेक महिलांसोबत जोडले गेले. जॉर्ज पोलिसांना गंभीर मारहाण केल्याप्रकरणी ६ महिने तुरूंगातही होता. अॅमी अनेकदा जॉर्जसोबत आपले फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करते. सध्या अॅमी जॉर्जसोबत दक्षिण आफ्रिकेत सुट्ट्या व्यतीत करत आहे.

Leave a Comment