मुले इंटरनेट, मोबाइल, टीव्ही, कॉम्प्युटरच्या अधीन जाऊ नये यासाठी स्नॅपचॅटच्या सीइओचा नियम

Untitled-1
सध्याची तरुणाई ही इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या अधीन गेली असून छोट्या मुलांच्या हातात पालक सर्रास मोबाइल देतात. तासन् तास मोबाइलवर काही मुले गेम्स खेळतात, टीव्ही पाहतात. हा अतिरेक काहीकाळाने एवढा वाढतो की कधी कधी मुलांच्या वागण्यापुढे खुद्द पालकही हतबल होतात. पण आपल्या मुलासाठी काही खास नियम स्नॅपचॅटचा मुख्य कार्यकारी अधिकारी इवान स्पीगलने तयार केला आहे. इंटरनेट, मोबाइल, टीव्ही, कॉम्प्युटरच्या अधीन मुलाने जाऊ नये यासाठी इवानने आपल्या सात वर्षाच्या मुलासाठी या गोष्टींच्या मर्यादीत वापरासाठी नियम घालून दिला आहे.

फक्त ९० मिनिटेच आठवड्यातून मुलाने इंटरनेट, मोबाईल वापरावा असा नियम त्याने फ्लाएनपुढे ठेवला आहे. तो आठवड्यातून एकदा ९० मिनिटांसाठी कोणत्याही एका गोष्टीचा वापर करुन शकतो. २८ वर्षीय इवानने तयार केलेल्या स्नॅपचॅट अॅपच्या जगभरातील तरुण पीढी पूर्णपणे अधीन गेली आहे. असे असताना स्वत:च्या मुलावर इवानने घालतेली बंधन ही प्रत्येक पालकाने विचार करण्यासारखीच आहेत. इवानने २०१७ मध्ये घटस्फोटीत मॉडेल मिरांडा मे केरशी लग्न केले. मिरांडाला ७ वर्षांचा मुलगा आहे. इवान या मुलाचे उत्तम संगोपन व्हावं यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो.

Leave a Comment