हनुमानाला घातले सांताक्लॉजचे कपडे, हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप

santa
गुजरातमध्ये हनुमानाच्या मूर्तीला सांताक्लॉजचे कपडे घालण्यावरून वाद निर्माण झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध व्यक्त केला आहे. दुसरीकडे, हे कपडे ऊबदार आणि मखमली असल्याचे मंदिराच्या पुजाऱ्याचे म्हणणे आहे.

गुजरात राज्यातील बोटाद या गावात सारंगपुर मंदिर येथे हा प्रकार घडला आहे. या मंदिरात दिवसातून दोनदा हनुमानाच्या मूर्तीचे कपडे बदलण्याची परंपरा आहे. या अंतर्गत रविवारी सकाळी या मारूतीला सांताक्लॉजचे कपडे घालण्यात आले.

अमेरिकेत राहणारे भक्त धमर भाई यांनी हे कपडे देणगी म्हणून दिले आहेत. ते ऊबदार आणि मखमली असून त्यावरून कोणताही वाद व्हायचे कारण नाही, असे मुख्य पुजारी विवेक सागर यांनी म्हटले आहे.

हे घातलेले लाल रंगाचे होते. यात एक टोपीही होती आणि या कपड्यांचा काठ पांढरा आहे. असे कपडे सांताक्लॉजचे असतात. त्यामुळे हे कपडे बदलावेत असे लोकांचे म्हणणे आहे.

‘‘सध्या धनुर्मास चालू आहे. या महिन्याच्या परंपरेनुसार, देवाला दररोज वेगवेगळे कपडे घातले जातात. तसेच थंडीच्या दिवसांत ऊबदार कपडे घालण्याची प्रथा आहे. अमेरिकेतून आलेले कपडेही आणि मखमली आहेत. यावर वाद होऊ नये,” असे भास्कर वृत्तपत्राने म्हटले आहे.

Leave a Comment