गुजरातमधील विद्यार्थी आता हजेरीसाठी येस सर ऐवजी म्हणणार जय हिंद

gujrat
अहमदाबाद – गुजरात सरकारने विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीचे बाळकडू पाजण्यासाठी नव्या वर्षानिमित्त सर्व शाळांना एक सूचना दिली आहे. गुजरातमधील शालेय विद्यार्थ्यांना १ जानेवारीपासून हजेरी लावायची असेल तर येस सर किंवा प्रेझेंट म्हणण्याऐवजी ‘जय हिंद’ किंवा ‘जय भारत’ म्हणावे लागेल, असा आदेशच गुजरात सरकारने काढला आहे.

गुजरात शिक्षण मंडळाने काढलेल्या आदेशानुसार, हा नियम पहिले ते बारावीत शिकणाऱ्या सर्व सरकारी, अनुदानित आणि खासगी शाळांना बंधनकारक असणार आहे. लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे शिक्षण मंत्री भुपेंद्रसिंह चुदासमा यांनी सोमवारी पार पडलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेतला. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी १ जानेवारीपासून करण्यात यावी, असे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Leave a Comment