येथून सांताक्लॉज मुलांच्या पत्रांना देतो उत्तरे

postoffice
नवीन वर्षाची सुरवात झाली म्हणजे नाताळच्या सणाची सांगता झाली. सांताक्लॉज हा मुलांचा आवडता देवदूत नाताळचे खास आकर्षण. दरवर्षी जगभरातील हजारो मुले या सांताक्लॉजला पत्रे पाठवितात आणि आजही सांताक्लॉज या मुलांच्या पत्रांना उत्तरे देतो. नॉर्थ पोल जवळ असलेल्या अमेरिकीतील इंडियाना येथे सांताक्लॉज म्युझियम, पोस्ट बॉक्स नंबर १, ४७५७९ आयएन हा सांताक्लॉजचा खरा पत्ता. आणि येथे गेली १०४ वर्षे मुलांकडून सांताक्लॉजला आलेल्या पात्रांची उत्तरे दिली जात आहेत. गेली दहा वर्षे हे काम करतेय ८७ वर्षाची पॅट कोच. त्यापूर्वी तिचे वडील हे काम करत असत.

patt
१९१४ साली इंडियाना पोस्टमास्तर जेम्स मार्टिन यांनी सांताक्लॉज च्या नावाने आलेल्या पत्रांना उत्तरे देण्याची प्रथा सुरु केली. हि आज परंपरा बनली आहे. पॅट सांगते, यंदाच्या वर्षी २५ हजार पत्रे आली. नोव्हेंबरपासून हि पत्रे येऊ लागतात. त्या सर्वाना उत्तरे दिली गेली आहेत. यात लहान मुलांचा सांताक्लॉजवर असलेला विश्वास तुटू नये ही भावना आहे. आम्ही मुलांना गिफ्ट देत नाही, तसा वादा करत नाही तर त्यांना संदेश देतो.

संदेश देण्यासाठी ३ मेसेज निवडले गेले आहेत. शेअरिंग करा, चांगला माणूस बना आणि दुसऱ्यांची मदत करा. यातील एक संदेश मुलांना उत्तर म्हणून पाठवीला जातो. जगभरातून सांताक्लॉजला येणाऱ्या लहान मुलांच्या पत्रांना उत्तरे मिळण्यामागे हे रहस्य आहे.

Leave a Comment