चीनमध्ये सुरु झाला विंटर फिशिंग फेस्टिव्हल

fishing
कडाक्याच्या थंडीत बर्फात गोठलेल्या सरोवरात मासेमारी करण्याची कल्पना कशी वाटते? खरोखरच यातील थ्रील अनुभवायचे असेल तर त्यासाठी चीनला प्रयाण करायला हवे. चीनमध्ये दरवर्षी ६३ दिवस चालणारा विंटर फिशिंग फेस्टिव्हल शुक्रवारपासून सुरु झाला असून तो २८ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. पहिल्या तीन दिवसात येथे १ लाख लोकांनी भेट दिली आहे.

changan
उणे १५ डिग्री तापमानामुळे येथील सरोवर गोठले असून बर्फ तोडून येथे मासेमारी करण्याची स्पर्धा होते. पकडलेल्या माश्यांचा येथे सायंकाळी लिलाव होतो. लिलावातून मिळणाऱ्या रकमेपैकी ३० टक्के सरोवराच्या देखभालीसाठी घेऊन उरलेली ७० टक्के रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते. यंदा पहिल्या दिवशी १५ किलोचा मासा पकडला गेला आणि त्याला लिलावात १ कोटी १ लाख( १,४५,५६० डॉलर्स) बोली मिळाली. हे एक रेकॉर्डच आहे.

चागन नावाचे हे सरोवर असून हे चीनमधील असे एकमेव सरोवर आहे, जेथे शेकडो वर्षे ही स्पर्धा घेतली जात आहे. येथे मंगोलियन मासे पकडण्याची पारंपारिक पद्धत शिकविली जाते. दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा फेस्टिव्हल सुरु होतो. बर्फ तोडून मासे पकडण्यासाठी १०० ठिकाणी चरे केले जातात.

Leave a Comment