आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडिया आणि विराट अव्वलस्थानी कायम

virat-kohli
मुंबई – भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करत आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत १२ स्थानांची झेप घेत १६व्या स्थानी विराजमान झाला आहे. बुमराहने तिसऱ्या कसोटी सामन्यात ८३ धावा देऊन ९ बळी टिपले. पहिल्या डावात त्याने ६ आणि ३ गडी दुसऱ्या डावात बाद केले. त्याची क्रमवारीत ही कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

बुमराहशिवाय या कसोटी सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणारा आणि दुसऱ्या डावात ६ बळी टिपणारा ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स यानेही चांगल्या कामगिरीच्या जोरावर तिसऱ्या स्थानी उडी घेतली आहे. त्यालादेखील प्रथमच टॉप५ मध्ये स्थान मिळाले आहे. फलंदाजांच्या यादीत टॉप १०मध्ये फारसा फरक पडलेला नाही. या यादीत ९३१ गुणांसह भारताचा कर्णधार विराट कोहली हा अद्याप पहिल्या क्रमांकावर आहे. तर १० स्थानाच्या बढतीसह ऋषभ पंत ३८व्या तर रोहित शर्मा ११ स्थानाच्या बढतीसह ४४ व्या स्थानावर पोहोचला आहे. रवींद्र जाडेजा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत एक स्थान घरून तिसऱ्या स्थानी गेला आहे. पण कसोटी क्रमवारीत टीम इंडिया ११६ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे.

Leave a Comment