एका कसोटी मालिकेत सर्वाधिक कॅच घेत ऋषभ पंतने रचला विश्वविक्रम

rishabh-pant
मेलबर्न : भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात 137 धावांनी विजय मिळवला. भारताचा विकेटकीपर ऋषभ पंतने या मालिकेत एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. एखाद्या कसोटी मालिकेत पंत भारताकडून सर्वाधिक कॅच घेणारा विकेटकीपर ठरला आहे.

ऋषभ पंतने ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर नॅथन लियोनची कॅच घेत तिसऱ्या कसोटी सामन्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मालिकेतील ऋषभ पंतची ही 20 वी कॅच होती. ऋषभ या कॅचनंतर एका कसोटी मालिकेत सर्वाधिक कॅच घेणारा विकेटकीपर ठरला. नरेन ताम्हाणे आणि सय्यद किरमानीचा विक्रम पंतने मोडला आहे.

एका कसोटी मालिकेत ताम्हाणे आणि किरमानी यांनी सर्वाधिक 19-19 कॅच घेतल्या आहेत. पाकिस्तानविरोधात 1954-55 मध्ये पाच सामन्यांच्या मालिकेत ताम्हाणे यांनी 19 कॅच घेतल्या होत्या. तर पाकिस्तानविरोधातच 1970-80 मध्ये किरमानी यांनी सहा सामन्यांच्या मालिकेत 19 कॅच घेतल्या होत्या. पण पंतने 20 विकेट घेत ताम्हाणे आणि किरमानी यांनी मागे टाकले आहे.

Leave a Comment