या आर्थिक वर्षात घोटाळेबाजांनी बँकांना लावला 41 हजार 167 कोटी रुपयांचा

fraud
मुंबई – 2017-18 मध्ये आर्थिक घोटाळेबाजांनी बँकांचे 41 हजार 167 कोटी रुपये लुटले असल्याची आकडेवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जारी केली आहे. हा आकडा गतवर्षीच्या आकडेवारीशी तुलना करता 72 टक्क्यांनी जास्त आहे. हा आकडा गतवर्षी 23 हजार 933 कोटी होता. बँकांची 2017-18 मध्ये फसवणूक केल्याची 5076 प्रकरणे समोर आली असून हा आकडा गतवर्षी 5917 एवढा होता. गेल्या चार वर्षांपासून आकडेवारीवरुन बँकांची फसवणूक होण्याची प्रकरणे वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.

2017 -18 मध्ये बँकांची फसवणूक केल्याची जी प्रकरणे समोर आली आहेत त्यामध्ये ऑफ बॅलेन्स शीट ऑपरेशन, परदेशी चलन व्यवहार, जमा खाते आणि सायबर गुन्हे यांचा समावेश जास्त आहे. यावर्षी बँकांनी सर्वात जास्त सायबर फसवणुकीच्या तक्रारी केल्या आहेत. 2059 सायबर फसवणुकीची प्रकरणे समोर आली असल्यामुळे 109.6 कोटींचा फटका बँकांना बसला आहे. गतवर्षी 1372 प्रकरणांमध्ये बँकांनी 42.3 कोटींचे नुकसान झाल्याची माहिती दिली होती.

Leave a Comment