कॉफीपासून कंडोमपर्यंत २४ तास होम डिलिव्हरी देणारी डून्झो

dunzo
आजकाल ऑनलाईनवर आपल्या गरजेचे सामान मागविणे ही सामान्य बाब झाली आहे. मात्र ऑनलाईन क्षेत्रात चोवीस तास डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्या कमी आहेत. कॉफी पासून कंडोम पर्यंत सर्व प्रकारच्या वस्तू दिवसाच्या कोणत्याही वेळी पोहोचविणाऱ्या डून्झोने त्यांनी २०१८ सालात लेट नाईट डिलिव्हरी दिलेल्या वस्तूंची एक रंजक यादी प्रसिद्ध केली आहे.

ही कंपनी ग्राहकांना चोवीस तास डिलिव्हरी सेवा देणारी कंपनी आहे. तिच्या आकडेवारीनुसार कंपनीने २०१८ मध्ये १३५१७ गर्भनिरोधके रात्री उशिरा डिलिव्हर केली असून ३०८ ठिकाणी एकाच रात्री दोन वेळा कंडोम पुरविले आहेत. २०१८ मध्ये कंपनीने एकूण ३३४७८ वस्तू रात्री उशिरा पोहोचविल्या असून त्यात सिगरेट, कोल्ड ड्रिंक, कॉफी यांची संख्या अधिक आहे. यातून कंपनीने शहरात राहणारे लोक आळशी बनत असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

कंपनीने असेही निरीक्षण नोंदविले आहे कि ज्या वस्तू दुकानात जाणून प्रत्यक्ष मागणे थोडे अवघड जाते अश्या वस्तू त्यांच्याकडून मागविल्या गेल्या आहेत. २०१८ मध्ये ४ हजार कॉफी, ६ हजार दही पाकिटे लोकांनी मागविली असून व्हॅलेन्टाइन डेला एकाच माणसाने ८९ आईस्क्रीम टब मागविले होते. बंगलोर येथे सर्वात कमी वेळात म्हणजे केवळ ७ मिनिटात सॅलडची डिलिव्हरी कंपनीने केली तसेच ४२ किमी अंतरावर केक डिलिव्हरी केली असेही या माहितीत नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment