सरत्या वर्षात भारतीयांनी काय काय हादडले याची यादी

uber
सरत्या वर्षात भारतीयांनी काय काय खाण्यास अधिक पसंती दिली याची माहिती उबरईटस आणि स्विगी या ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवा देणाऱ्या कंपन्यांनी प्रसिद्ध केली आहे. गेल्या सहा महिन्यातील डेटाचा आधार त्यासाठी घेतला गेला असून या काळात भारतीयांनी हेल्दी फूड आणि ड्रिंकला अधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे.

dosaa
उबरइट्सच्या माहितीनुसार सरत्या वर्षात भारतीय पदार्थांना देशातच नाही तर विदेशातहि अधिक पंसंती मिळाली असून त्यानंतर अमेरिकन आणि चीनी पदार्थांचा क्रमांक आहे. प्रमुख शहरातून हा डेटा गोळा केला गेला आहे. त्यात नास्त्यासाठी इडली सांबर, डोसा यासारख्या दक्षिणात्य पदार्थांना अधिक पसंती मिळाली आहे. दुपारच्या जेवणात पराठा, रायता, भात, भाजी यांना अधिक पसंती आहे.

juices
स्विगीच्या माहितीनुसार या वर्षात भारतीयांनी टरबूज, संत्री, मोसंबी, अननस फळांच्या ज्यूसला सॉफ्टड्रिंक पेक्षा अधिक पसंती दिली आहे. सायंकाळी ऑफिसमध्ये काम करणार्यांनी पास्ता, पिझाला पसंती दिली असली तरी मध्यरात्री खाणाऱ्यानी विविध प्रकारचे रोल्स अधिक पसंत केले आहेत. यंदा मांसाहारी पदार्थांपेक्षा शाकाहारी पदार्थांना अधिक मागणी होती.

swiggy
अहमदाबाद मध्ये शाकाहारी पदार्थासाठी मोठी मागणी होती तर दिल्ली, मुंबई, पुणे, चंडीगड अश्या शहरात रोस्टेड चिकन आणि फ्रुट सॅलडला विशेष पसंती होती. सणाच्या काळात दुर्गा पूजेला मिठाई आणि कलाकंद, ईद साठी बटरचिकन, हैद्राबादी बिर्याणी, हलीम हॉट होते तर गणेशोत्सव काळात लाडूची मागणी ४०० पटीने वाढली होती असेही या पाहणीत दिसून आले.