३ भारतीय ७ दिवसांसाठी करणार अंतराळात मुक्काम

gaganyan
केंद्र सरकारने महत्वाकांक्षी गगनयान प्रकल्पासाठी १० हजार कोटींचा निधी मंजूर केला असून या मोहिमेअंतर्गत ३ भारतीय अंतराळात किमान ७ दिवस मुक्काम करू शकणार आहेत. केंद्रीय मंत्री रविप्रसाद यांनी शुक्रवारी ही माहिती पत्रकारांना दिली. या मोहिमेमुळे अंतराळात मानव पाठविणारा भारत चौथा देश बनणार आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी भाषणात पंतप्रधान मोदी यांनी २०२२ पर्यंत ही मोहीम पूर्ण केली जाणार असल्याची घोषणा केली होती.

या मोहिमेसाठी सरकारने यापूर्वीच रशिया आणि फ्रांस यांच्यासोबत सहकार्य करार केला आहे. काही दिवसांपूर्वी इस्रोने क्रू कॅप्सूल मॉड्यूलची यशस्वी चाचणी घेतली आहे. यात अंतराळवीरांना अंतराळात काही दुर्घटना घडल्यास या कुपीतून पृथ्वीच्या कक्षेत सुरक्षित परतता येणार आहे. हि कुपी म्हणजे कॅप्सूल अंतराळवीर त्यांच्यासोबत नेऊ शकणार आहेत. ही कुपी इस्रोने विकसित केली आहे.

अंतराळप्रवासाला जाऊ इच्छिणाऱ्याची निवड करण्याचे काम सुरु झाले असून त्यासाठी संबंधिताला १० प्रकारच्या विविध चाचण्यांना सामोरे जावे लागणार आहे.

Leave a Comment