येथे अनुभवा दोन देशांना जोडणाऱ्या झिपलाईनचा थरार

limite
साहसाची ज्यांना आवड आहे अश्या लोकांसाठी एका झिपलाईनचा थरार खूपच रोमांचकारी ठरणार आहे. अश्या झिपलाईनवरून तुम्ही कदाचित कधीच प्रवास केलेला नसेल कारण हि झिपलाईन दोन देशांना जोडणारी आहे. स्पेन पासून पोर्तुगाल पर्यंत जाणारी हि झिपलाईन जगातील पहिले क्रॉसबॉर्डर झिपलाईन आहे.

स्पेनच्या एका शहरातून पोर्तुगालच्या दुसऱ्या शहरात जाणाऱ्या झिपलाईनचे नाव लिमिट झिरो असे असून ती ७२० मीटर लांबीची आहे. यातून ताशी ७० ते ८० किमीच्या वेगाने खाली जाता येते आणि हा प्रवास पूर्ण होण्यास १ तास लागतो. या प्रवासात खाली दिसणाऱ्या अनेक जागा तुम्ही एक्स्प्लोअर करू शकता.

या झिपलाईनवर जाण्यासाठी काही नियम आहेत. १४ वर्षाखालील कुणी यावरून जाऊन शकत नाही तसेच ११० किलो पेक्षा अधिक वजन असणाऱ्यांनाही जाता येत नाही. मात्र दिव्यांग व्यक्ती या झिपलाईनचा थरार अनुभवू शकतात कारण त्यांच्य्साठी वेगळे इन्स्ट्रक्टर नेमले गेले आहेत. ही झिपलाईन इंटरनॅशनल सर्टिफाईड असून येथे सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाते.

Leave a Comment