भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रोन ऑलिम्पिक

droneoli
भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रोन ऑलिम्पिक घेतले जात असून २०१९ च्या फेब्रुवारीमध्ये या स्पर्धा होणार आहेत. दरवर्षी बंगलोर येथे होत असलेल्या एरो इंडिया कार्यक्रमात या स्पर्धा २१ फेब्रुवारीला आयोजित केल्या जात आहेत. या मध्ये स्वदेशी तसेच विदेशी ड्रोन उत्पादक कंपन्या सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेचे आयोजन करण्यामागे देशातील ड्रोन स्टार्टअप कंपन्यांना प्रोत्साहन मिळावे असा उद्देश आहे आणि त्याचबरोबर भारतीय सेनेला विदेशी ड्रोनची क्षमता जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. यात ४ किलो वजनाखालील आणि ४ किलो पेक्षा अधिक वजनाचे अश्या कॅटेगरी आहेत. यात ३ प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातील. ड्रोनची सर्व्हीलांस क्षमता, सप्लाय ड्रोन चॅलेंज आणि फॉर्मेशन फ्लायिंग चॅलेंज म्हणजे एका प्रकारची ड्रोन किती फॉर्मेशन मध्ये उडू शकतात त्याचे प्रात्यक्षिक या स्पर्धा होणार आहेत. जिंकणाऱ्याना ३८ लाख रुपयांची पारितोषिके आणि मेडल दिले जाणार आहे.

Leave a Comment