या वर्षीही १२३४५६ हाच ठरला सर्वात खराब पासवर्ड

password
पासवर्ड मॅनेजमेंट कंपनी स्प्लॅश डेटाने २०१८ सालात सर्वात खराब ठरलेल्या २५ पासवर्डची यादी जाहीर केली असून यंदाही १२३४५६ हा पासवर्ड एक नंबरवर आहे. ही यादी तयार करताना कंपनीने जगभरात हॅक झालेल्या ५० लाखाहून अधिक अकौंटचे विश्लेषण केले असून त्यात १० टक्के युजरनी सहज हॅक करता येणारे पासवर्ड वापरल्याचे दिसून आले आहे.

या यादीत दोन नंबरवर पासवर्ड हाच शब्द आहे तर अन्य यादीत १ ते ९ आकडे, १ ते ८ आकडे, १२३४५, ११११११, १२३१२३, ६६६६६६, abc १२३, क्वेरी १२३, aa१२३४५६ हे नंबर तसेच पासवर्ड २, सनशाईन, क्वेरी, आय लव्ह यु, प्रिन्सेस, अॅडमीन, चार्ली, डोनाल्ड, फुटबॉल, वेलकम, मंकी अश्या शब्दांचा समावेश आहे. अकौंट हॅक होण्यापासून बचाव करायचा असेल तर वेगळ्या अकौंट साठी वेगळा पासवर्ड वापरावा असा सल्ला कंपनीने दिला असून त्यामुळे एक अकौंट हॅक झाले तरी हॅकरला दुसरे अकौंट ओपेन होणार नाही कारण त्याचा पासवर्ड वेगळा असेल.