हिमवर्षावात डलहौसीच्या बाजारात दणकून करा खरेदी

dalhausi
हिमाचल हे मुळातच निसर्गाचे वरदान मिळालेले राज्य. त्यातील चंबा जिल्यातील डलहौसी हिवाळ्यात अधिकच सुंदर बनते. चोहोबहुने असलेल्या पर्वतरांगा बर्फाची चादर घेतातच पण घराची छपरे, झाडे, रस्ते बर्फाने झाकलेले असतात. हिमवर्षावाचा आनंद लुटायला येथे पर्यटक मोठ्या संखेने येतात. बाकी खूप काही करायला नसले तरी डलहौसी मध्ये असलेल्या विविध प्रकारच्या बाजारात खरेदीचा आनंद भरपूर लुटता येतो. अश्या काही बाजारांची माहिती

banikhet
गांधी चौक या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या बाजारात पारंपारिक बॅग्ज, शाली, गरम कपडे, हस्तकलेच्या विविध वस्तू, शाली मिळतील त्याचबरोबर चंबा चुखा म्हणजे खास चटणी आणि चंबा चप्पल मिळतात. चंबा जरीस नावाची मिठाई जरून चाखून पहावी.

antique
डलहौसीपासून सात किमीवर बनिखेत आहे. तेथील बाजार खास स्मृतीचिन्हे खरेदी अशी जसा प्रसिद्ध आहे तसाच वुलन कपड्यांसाठीही. येथे बार्गेनिंग करून खरेदी करता येते. बजेट शॉपिंग होते शिवाय डलहौसीच्या आठवणी रूपाने अनेक वस्तू घेता येतात.

tibet
तिबेटी मार्केटमध्ये बहुतेक साऱ्याच वस्तू मिळतात. मिरर वर्क केलेले कपडे, लोकरी कपडे, चाकू सुऱ्या, पेंटिंग, गालिचे, चपला, खेळणी, लाकडी वस्तू, लोकल हँडमेड चॉकलेट अशी भरपूर खरेदी करता येते.हिमाचल गिफ्ट इम्पोरीयम मध्ये अँटिक वस्तू, मूर्ती, बौद्ध आर्ट वस्तू, चांदी तांब्याचा अनेक वस्तू येथे मिळतात. त्याचबरोबर पारंपारिक हस्तकला वस्तू मोठ्या प्रमाणात मिळतात. विविध प्रकारची इमिटेशन ज्युवेलरी नजर खिळवून ठेवते.

Leave a Comment