लिंकनने पुन्हा आणली कॉन्टीनेंटल सुसाईड डोअर कार

lincoln
लिंकन कार कंपनीने पुन्हा एकदा कॉन्टीनेंटल सुसाईड डोअर कार बाजारात सादर केली आहे. या कारचे वैशिष्ट म्हणजे याचा मागचा दरवाजा मागे उघडण्याऐवजी पुढे उघडतो. १९६० साली या कारना खूपच पसंती होती. विशेष म्हणजे कार निर्मितीचा खर्च कमी व्हावा म्हणून या कारला पुढच्या आणि मागच्या दरवाजाचे हँडल एकाच जागी दिले गेले होते. रोल्स रॉयास या कारलाही असेच दरवाजे होते. या कारची किंमत ७० लाख रु.असेल असे सांगितले जात आहे.

दोन्ही दाराची हँडल एकाच जागी दिल्याने व्हायचे असे कि कार सुरु असताना मागचा दरवाजा उघडला तर वाऱ्यामुळे तो बंद करणे अवघड व्हायचे म्हणून त्याला सुसाईड डोअर असे नाव पडले होते. २००२ साली या कारची विक्री घटली त्यामुळे तिचे उत्पादन बंद केले गेले.२०१६ मध्ये ती पुन्हा लाँच केली गेली.

लिंकनही फोर्ड मोटारची उपकंपनी आहे. फोर्डचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचा मुलगा एद्सेल याने हि कार त्याच्या खासगी वापरासाठी बनविली होती मात्र त्याच्या मित्रांनी अशीच कार मागितली तेव्हा तिचे उत्पादन सुरु केले गेले आणि १९६१ मध्ये हे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरु झाले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांना गोळी घातली गेली तेव्हा ते याच कार मधून प्रवास करत होते. फर्स्ट लेडी जॅकलीन केनेडी यांच्याकडे हीच कार होती. प्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो याच्याकडे १९६३ सालची पांढरी कॉन्टीनेंटल सुसाईड डोअर कार होती.

Leave a Comment