अतिसुंदर पंचरंगी केनो क्रिस्टल नदी

nadi
जगभरात नदीच्या काठावरच अनेक संस्कृती नांदल्या आहेत. नदी म्हणजे जीवन. जगभरात प्रत्येक देशांना त्याच्या नद्यांचा सार्थ अभिमान असतो. भारतासारख्या देशात नदीला माता म्हटले जाते, तिची पूजा केली जाते. अश्या या जीवनदायिनी नदीची अनेक रूपे पाहायला मिळतात. निसर्ग हा सर्वात मोठा किमयागार. तो कधी आणि कोणते रूप कुणाला देईल हे सांगणे अवघड. अमेरिकेच्या कोलंबिया राज्यातील केनो क्रिस्टल नदीचे रुपडे जुलै ते नोव्हेंबर या काळात इतके प्रचंड बदलते कि एरव्ही नेहमी सारखी दिसणारी हि नदी या काळात चक्क पंचरंगी होऊन जाते.

keno
या नदीला त्यामुळे रिव्हर ऑफ फाईव्ह कॅलर्स असेही म्हणतात. या नदीपाशी जाण्याचा रस्ता तसा खडतर आहे तरीही तिचे हे अनोखे सौंदर्य पाहण्यासठी दरवषी लाखो पर्यटक हि दुर्गम वाट तुडवितात. या नदीला हे रंग मिळतात ते पावसाळ्यात या नदीच्या पाण्यात वाढणाऱ्या विविध झुडपांमुळे आणि त्यावर फुलणाऱ्या फुलांमुळे. ही झुडपे निम्मी पाण्यात आणि निम्मी वर वाढतात. त्यामुळे नदीचे पाणी एकाचवेळी हिरवे, पिवळे, लाल, काळे आणि निळे दिसते. नदीमध्ये सुंदर गोलाकार दगडी पूल आहेत. त्यामुळे या नदीचे सौंदर्य शतपटीने वाढते.

Leave a Comment