सुझुकी हयाबुसा,१४ लाखाची बाईक भारतात लाँच

hayabusa
सुझुकी मोटारसायकल इंडिया लिमिटेड कंपनीने त्यांची लोकप्रिय बाईक हयाबुसाचे नवीन मॉडेल गुरुवारी भारतात लाँच केले असून या बाईकची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत १३.७४ लाख रुपये असून ऑन रोड या बाईकसाठी १४ लाखापेक्षा जास्त किंमत मोजावी लागणार आहे. मेटालिक ग्रे आणि ग्लास स्पार्कल ब्लॅक अश्या दोन नवीन रंगात हि बाईक उपलब्ध आहे.

सुझुकी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संतोषी उचीडा म्हणाले, गेली २० वर्षे हयाबुसा बाईक लोकप्रिय स्पोर्ट्स बाईकपैकी एक आहे. भारतातही या बाईकला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नवीन बाईकमध्ये अपडेटेड ग्राफिक व २ साईड रीफेल्क्टर दिले गेले आहेत. या बाईकला १३४० सीसी इन लाईन ४ सिलिंडर इंजिन दिले गेले असून ती ० ते १०० किमीचा वेग २.७४ सेकंदात घेते. तिचा टॉप स्पीड आहे ताशी २९९ किमी.

Leave a Comment