भारतातील अॅपल आयफोन प्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे. अॅपलचे हायएंड आयफोन आता मेक इन इंडिया अंतर्गत भारतात असेम्बल केले जाणार आहेत. तैवानची कंपनी फॉक्सकॉनने त्यांच्या तमिळनाडूतील पेराम्बदूर प्रकल्पात प्रथमच २०१९ च्या सुरवातीपासून आयफोन असेम्बल करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी २५ अब्ज रुपयांची गुंतवून केली गेली आहे.
अॅपलचे हायएंड आयफोन भारतात बनणार
याच प्रकल्पात फोक्सकॉन शाओमी कॉर्पसाठीही फोन तयार करते आहे. आयफोन असेम्बल करण्यासाठी प्रकल्पाचा विस्तार केला गेला आहे. यामुळे २५ हजार नवे रोजगार निर्माण होणार आहेत. यापूर्वी भारतात विस्ट्रॉन कॉर्प बंगलोर येथील प्रकल्पात अॅपलचे एसई आणि ६ एस या स्वस्त आयफोनची निर्मिती करत होती. आता महागडे आयफोनहि भारतातच बनणार आहेत.