बोल्टच्या गोलंदाजीपुढे अवघ्या २० मिनिटांत श्रीलंकेचे दहन

trent-boult
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान दुस-या कसोटी या सामन्यात श्रीलंकेचे फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे ढेपाळले. श्रीलंकेच्या फलंदाजांनी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्डपुढे लोटांगण घेतले. अवघ्या १५ चेंडूत बोल्टने ४ धावा देत सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. लंकेच्या संघाने कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बोल्टच्या माऱ्यापुढे अवघ्या २० मिनीटांमध्ये आपले सहा गडी गमावले. १०४ धावांवर श्रीलंकेचा संघ गारद झाला. श्रीलंकेने पहिल्या दिवसाअखेर ४ बाद ८८ धावा केल्या होत्या. टिम साऊदीने पहिल्या दिवशी लंकेच्या चार गड्यांना बाद केले होते. तर बोल्टने दुसऱ्या दिवशी अवघ्या २० मिनिटांत लंकादहन केले.

दरम्यान, पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाज सुरंगा लकमलने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या १७८ धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात टिम साऊदीच्या प्रभावी माऱ्यापुढे लंकेचीदेखील दिवसअखेर ४ बाद ८८ धावा अशी अवस्था झाली आहे.

Leave a Comment