राहुल द्रविडचा ‘हा’ मोठा विक्रम कोहलीने मोडला

virat-kholi
मेलबर्न – भारत सध्या चालू असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील तीसऱ्या कसोटी सामन्यात चांगल्या स्थितीत अशून भारताकडून कर्णधार विराट कोहली (८२), मयंक अगरवाल (७६) आणि चेतेश्वर पुजारा (१०६) या तीघांनी शानदार खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला.

विराट कोहली सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शतक करण्यास अपयशी ठरला. पण भारताचा महान फलंदाज राहुल द्रविडचा कसोटी क्रिकेटमधला एक विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे. राहुल द्रविडच्या नावावर भारतासाठी कसोटी खेळताना एका वर्षात विदेशात सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रम होता. २००२ मध्ये त्याने ११ सामन्यांमध्ये ११३७ धावा केल्या होत्या. तर आता विराट कोहलीच्या नावावर ११ सामन्यांमध्येच ११३८ धावा झाल्या आहेत.


दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज कर्णधार ग्रॅमी स्मिथच्या नावावर एका वर्षात विदेशात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. २००८ या वर्षात त्याने १२१२ धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर सर विवियन रिचर्ड्स आहेत. तर तिसऱ्या क्रमाकांवर विराट कोहलीचे नाव आहे.

Leave a Comment