हुवाईने यावर्षी विकले तब्बल २ कोटी स्मार्टफोन

huwaie
नवी दिल्ली – यावर्षी चिनी मोबाईल कंपनी हुवाईने पी२०, मेट२० आणि नोव्हा सिरीज हे त्यांचे 2कोटी मॉडेल विकले आहेत. हुवाई ही अॅपलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोबाईल कंपनी आहे. दुसऱ्या तिमाही आणि तिसऱ्या तिमाही दरम्यान हुवाईचा जगभरातील बाजारपेठेतील हिस्सा १४.६ टक्के झाला आहे. इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशनच्या (आयडीसी) आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

गेल्या ८ वर्षापासून २०१८ मध्ये स्मार्टफोनची विक्री ३ कोटींपासून २० कोटीपर्यंत झाली आहे. ६६ पट ही वाढ झाल्याचे हुवाई कंपनीने म्हटले आहे. हुवाईच्या स्मार्टफोनचा वापर जगभरातील १७० देशांमध्ये ५० कोटी ग्राहक करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. हुवाई कंपनीने २०१७ मध्ये ५ कोटी स्मार्टफोनची विक्री केली आहे. भविष्यात आम्ही ग्राहककेंद्रीत संकल्पना समोर ठेवून नवीन संशोधनाचा अवलंब करणार आहोत. त्यातून प्रत्येक बाबतीत आगामी स्मार्टफोनच्या क्रांतीत सर्वात पुढे राहण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सीईओ रिचार्ड यु यांनी सांगितले.

Leave a Comment