हिटमॅन रोहित शर्माचे यंदाच्या वर्षात सर्वाधिक षटकार

rohit-sharma
मुंबई – अनेक रोमांचकारी सामने क्रिकेट प्रेमींना २०१८ या वर्षात पाहायला मिळाले. या वर्षात काही फलंदाजांनी तर धावाचा पाऊस पाडला. कर्णधार विराट कोहली सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत अव्वल स्थानी आहे, तर भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा सर्वाधिक षटकार खेचण्यात सर्वात पुढे आहे. भारतीय संघाने यंदाच्या वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन केले आहे.

हिटमॅन रोहित शर्मा २०१८ या साली सर्वाधिक षटकार मारण्यात सर्वात पुढे आहे. या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितने १९ सामन्यात १०३० धावा केल्या आहेत. त्याने त्यात ३९ गगनचुंबी षटकार खेचले आहेत. त्याने यंदाच्या वर्षात काही आकर्षक खेळीही केल्या आहेत.

इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयस्टो सर्वाधिक षटकार खेचण्यात दुसऱ्या स्थानी आहे. या वर्षी त्याने २२ एकदिवसीय सामन्यात १०२५ धावा केल्या आहेत. त्यात एकूण ३१ षटकार खेचले आहेत. आपल्या फलंदाजीने डाव्या हाताने फलंदाजी करणारा व गोलंदाजाचा कर्दनकाळ मानला जाणारा विंडीजचा युवा फलंदाज शिमरोन हेटमायरने साऱ्यांनाच चकित केले आहे. १८ एकदिवसीय सामन्यात हेटमायरने ७२७ धावा काढल्या आहे. त्याने या वर्षी ३० षटकार मारले आहेत.

झिम्बाब्वे क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी फलंदाजामध्ये ज्याची गणना होते त्यात टेलरचे नाव घेतले जाते. टेलर सर्वाधिक षटकार मारण्यात चौथ्या स्थानी आहे. २१ एकदिवसीय सामन्यात त्याने ८९८ धावा काढत २२ षटकार ठोकले आहेत. भल्या भल्या गोलंदाजांची झोप उडविणारा विंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलला सगळे जग ओळखते. तो सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहचला आहे. सध्या उत्तुंग षटकार मारण्यासाठी प्रसिध्द असलेला गेल केवळ टी-२० क्रिकेट खेळत आहेत. त्याने यंदाच्या वर्षात ९ एकदिवसीय सामन्यात ३०७ धावा काढल्या आहेत. त्यात २२ षटकारांचा समावेश आहे.

Leave a Comment