गुजरातमधील तरुणीची लांबसडक केसामुळे गिनिज बुकमध्ये नोंद

record
गुजरातमधील एका तरुणीचे केस सामान्यपणे व्यक्तीची जितकी उंची असते तितके लांब आहेत. या तरुणीचे नाव निलांशी पटेल असे असून गुजरातमध्ये ती राहते. ती अवघ्या १६ वर्षांची असून एवढ्या लहान वयात इतके लांब केस असणाऱी निलांशी कदाचित एकमेव भारतीय असेल. ५ फूट ७ इंच एवढी निलांशीच्या केसांची लांबी आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही तिच्या याच लांबसडक केसांमुळे तिची नोंद झाली आहे. तिचे केस आता एवढे कसे वाढले असतील असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर मागील १० वर्षांपासून तिने केस कापले नाहीत. एकदा केस कापायला गेल्यावर चुकीचा हेअरकट झाल्यामुळे तिने चिडून परत कधीच केस न कापण्याचा निर्णय घेतल्यानंतर कधीच केस न कापल्याने ते एवढे लांब वाढले.

निलांशी आपल्या या लांबसडक केसांबाबत म्हणते, मी सहावीत असताना एकदा हेयरकट करायला गेले होते. तो तेव्हा चुकला आणि मी अतिशय निराश झाले. मी तेव्हापासून परत कधीच केस न कापण्याचा निर्णय घेतल्यामुळे माझे केस एवढे लांब झाले आहेत. तिच्यासाठी या केसांची काळजी घेणे नक्कीच आव्हानात्मक असणार. ती त्याबाबत सांगताना म्हणते, आठड्यातून एकदा मी केस धुते. माझी आई ते धुण्यासाठी आणि विंचरण्यासाठी मला मदत करते असेही तिने सांगितले. ती म्हणते, मला माझ्या केसांमुळे खूप अडचणी येत असतील, असे लोकांना वाटते. पण असे अजिबात नाही. माझ्या एवढ्य़ा मोठ्या केसांबरोबरच मी खेळही खेळते. ते माझ्यासाठी लकी चार्म आहेत. इतके लांब असल्याने या केसांची मी वेणी घालते किंवा त्याचा डोक्यावर आंबाडा बांधते असेही ती म्हणाली.