‘एक लडकी को देखा…’चा ट्रेलर रिलीज

anil-kapoor
आजही सर्वांच्या स्मरणात अनिल कपूर यांच्या ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ चित्रपटातील ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे गाणे आहे. प्रेक्षकांना हेच गाणे पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ चित्रपट येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

अनिल कपूर, जूही चावला अन् राजकुमार सोनमची हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांना ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. ट्रेलरमध्ये सोनमच्या आयुष्यातील एक गूपित ज्याबद्दल ती वारंवार बोलते, हे नक्की काय असेल याबद्दल प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा हा ट्रेलर आहे. चित्रपटात अनिल कपूर, सोनम कपूर, राजकुमार राव आणि जूही चावला या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. चित्रपट १ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन विधू विनोद चोप्राची बहिण शैली चोप्रा करत आहे.