आयसीसीच्या ‘हॉल ऑफ फेम’ ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगचा समावेश

ricky-ponting
मेलबर्न – आयसीसीच्या क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंग सामील झाला असून त्याला ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चहापान सत्राच्या वेळी छोटेखानी कार्यक्रम झाला. रिकी पाँटिंगला आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये सामील करण्याची घोषणा डब्लिन येथे झालेल्या आयसीसीच्या वार्षिक संमेलनात करण्यात आली होती. रिकी पाँटिंग या सन्मानाच्या वेळी म्हणाला, की हा माझ्या आयुष्यातील खास क्षण आहे. आज मला माहीत झाले की ऑस्ट्रेलियाचे एकूण २५ खेळाडू या यादीत सामील झाले आहेत. माझ्यासाठी आजचा दिवस विशेष असल्याची प्रतिक्रिया यावेळी दिली. रिकी पाँटिंगने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६८ कसोटी सामन्यात १३ हजार ३७८ धावा तर ३७५ एकदिवसीय सामन्यात १३ हजार ७०४ धावा केल्या आहेत. १७ टी-२० सामन्यात त्याने ४०१ धाव केल्या आहेत.

Leave a Comment