हुंदाई सँता फे एसयूव्ही फिंगरप्रिंट टेक्नोलॉजीसह येणार

santafe
ऑटो इंडस्ट्रीमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर वाढत चालला असतानाचा स्मार्टफोन मध्ये वापरल्या जाणाऱ्या नव्या फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजीचा वापर सर्वप्रथम हुंदाई कंपनी त्यांच्या एसयूव्ही मध्ये करणार असून ही सँता फे एसयूव्ही २०१९ च्या पहिल्या तिमाही मध्ये लाँच केली जात आहे.

या एसयूव्ही मध्ये वापरल्या गेलेल्या फिंगरप्रिंट टेक्नोलॉजीमुळे चालक कारचे दरवाजे अनलॉक करणे, कार सुरु करणे करू शकेलच पण या तंत्रज्ञानाचा वापर चालकाच्या सोयीनुसार ड्रायव्हिंग सुविधा देण्यासाठी, तसेच चालकाची ओळख पटविणे, सीट पोझिशन ऑटोमॅटीकली अॅडजस्ट करणे, फिचर कनेक्ट करणे, साईड व्यू मिरर अँगल अॅडजस्ट करणे यासाठी होऊ शकणार आहे.

कार अनलॉक करण्यासठी दरवाजाच्या हँडलवर असलेल्या सेन्सरवर बोट ठेवावे लागेल. त्यानंतर कारमधील फिंगरप्रिंट कंट्रोलरला सिग्नल मिळेल आणि ड्रायव्हरची ओळख पटविली जाईल. कार सुरु करताना इग्निशन वर असलेल्या फिंगरप्रिंट सेन्सरला टच करावा लागणार आहे.

Leave a Comment