भारतात एक नाही तर पाच काशी क्षेत्रे

guptkashi
मोक्ष ही भारतीय संकल्पना हिंदूधर्मियात चांगलीच रुजली असून मोक्ष मिळायचा असेल तर एकदातरी काशी ला जायला हवे अशी भावना त्यांच्यात आहे. काशी, वाराणशी, बनारस अश्या अनेक नावानी हे तीर्थक्षेत्र जगात प्रसिद्ध आहे. पण प्राचीन ग्रंथातून भारतात पाच काशी क्षेत्रे असल्याचे उल्लेख आहेत आणि हि ठिकाणे पंचकाशी म्हणून ओळखली जातात. विशेष म्हणजे ही सर्व क्षेत्रे महादेवाला समर्पित आहेत. गुप्तकाशी, उत्तरकाशी, वाराणसी, दक्षिणकाशी आणि शिवकाशी या नावाने ती प्रसिद्ध आहेत.

गुप्तकाशी उत्तराखंड राज्यात रुद्रप्रयाग जिल्यात असून केदारनाथ यात्रेचा मार्ग येथून जातो. येथे अगस्त्य मुनींचा आश्रम असून बाणासुर याची राजधानी शोणितपूरचे अवशेष येथे पाहायला मिळतात. असे सांगतात की महाभारत युद्धानंतर ब्रह्महत्येचे पाप लागू नये म्हणून पांडव शंकर दर्शनाला आले तेव्हा शंकराला त्यांना दर्शन द्यायचे नव्हते म्हणून शंकर येथे गुप्त होऊन कैलासावर गेले. त्यामुळे या ठिकाणाला गुप्त काशी असे नाव पडले.

uttar
उत्तरकाशी उत्तराखंड राज्यात हृषीकेशपासून १५५ किमीवर असून येथील विश्वनाथ मंदिराची स्थापना परशुरामाने केली आहे. या मंदिराचे बांधकाम वाराणसीतील विश्वनाथ मंदिराप्रमाणेच आहे. केदार यात्रेला जाणारे यात्रेकरू उत्तरकाशी मंदिरात दर्शन घेऊन पुढे जातात. हे शहर उत्तरदिशेला असल्याने त्याचे नाव उत्तरकाशी पडले आहे.

varanasi
वाराणसी हे गंगेच्या काठी वसलेले अति प्राचीन शहर. वरुणा आणि असी अश्या दोन नद्या येथे गंगेत मिळतात. या दोन नद्यांवरून या शहराला वाराणसी असे नाव पडले आहे. मोक्ष मिळण्यासाठी येथे गंगेत स्नान करण्यासाठी दरवर्षी लाखो लोक येत असतात.

mirzapur
दक्षिण काशी हे स्थान २ हजार वर्षे जुने असून ते मिर्झापूर जिल्ह्यात आहे. अदवा नदीकाठी वसलेल्या या स्थानी प्राचीन अतिभव्य शिवमंदिराचे अवशेष आहेत. काशीला जाण्याचा हा मुख्य मार्ग मनाला जातो.

shivkashi
शिवकाशी हे तमिळनाडूतील शहर आज जगात फटका कारखाना उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. मात्र १४ व्या शतकात मदुराई महाराज हरीकेसरी पोडीयान यांनी वाराणसी येथे महादेवाची पूजाअर्चा केल्यावर त्यांना वरदान म्हणून शिवलिंग आणि गाय मिळाली. परत येताना वाटेत ते एका बेलाच्या झाडाखाली थांबले. निघताना गाय तेथून हलेना तेव्हा त्यांनी तेथेच शिवलिंग स्थापन करून मंदिर बांधले असे सांगितले जाते. त्यामुळे हे महत्वाचे शिवमंदिर मानले जाते.

Leave a Comment