क्रिसमस ट्री सजविण्यामागे आहे हा विश्वास

khristree
नाताळ मध्ये घरोघरी क्रिसमस ट्री सजविले जाते आणि ही परंपरा शेकडो वर्षे जुनी आहे. क्रिसमस ट्री साठी फर या झाडाची फांदी आणली जाते आणि ते जीवन निरंतर आहे याचे प्रतिक मानली जाते. जेथे नाताळ मध्ये हे झाड सजते त्या घरातील लोकांना ईश्वर दीर्घायुष्य लाभावे असा आशीर्वाद देतो असा समज आहे. यामुळे घरातील मुलांचे आयुष्य वाढते अशीही भावना आहे.

क्रिसमस ट्री सजविण्याची सुरवात उत्तर युरोपात झाली असे इतिहास सांगतो. त्यावेळी फर झाडाची फांदी कापून घराबाहेर ती साखळीने लटकविली जात असे. १९ व्या शतकात हि परंपरा इंग्लंड मधून जगभरात पसरली. या ट्रीवर सजावटीच्या वस्तूंसह खाण्याचे पदार्थ सजविण्याची प्रथा जर्मनीत सुरु झाली. सोन्याच्या वर्खात लपेटलेले सफरचंद, जिंजर ब्रेड असे पदार्थ त्यावेळी या फांदीवर लटकाविले जात असत.

असा समज आहे, जेव्हा येशूचा जन्म झाला तेव्हा मदर मेरीला देवदूतानी या सदाबहार फर वृक्षाची भेट दिली होती. आताच्या काळात क्रिसमस ट्रीची सजावट मेणबत्त्या, टॉफी, रंगीबेरंगी रिबीन, घंटा, विद्युत रोषणाईने केली जाते. या झाडावर मेणबत्त्या लावायची प्रथा १७ व्या शतकापासून सुरु झाली असेही इतिहास सांगतो.

Leave a Comment