अशी आहे केकची मजेदार कहाणी

pestry
नाताळच्या सणाचे सेलेब्रेशन केक शिवाय पुरे होऊ शकत नाही. या दिवसात खास प्लम केक आवर्जून बनविला जातो आणि नातेवाईक, सगेसोयरे यांना प्रेमाने खिलाविला जातो. पण एक काळ असा होता जेव्हा केक मध्ये लोणी वापरण्याची परवानगी नव्हती. आज मात्र या केकचे रुपडे खूपच बदलले असून आता तो जेवणानंतरच्या डेझर्टचा अविभाज्य भाग बनला आहे.

jerman
१५४५ साली क्रिसमस ब्रेड नावाने स्टॉलेन केक जर्मनीत प्रथम बनविला गेला मात्र हा केक घट्ट आणि बेचव असे कारण त्यात लोणी वापरले जात नसे. हा केक कणिक, यीस्ट आणि तेल घालून बनविला जाई. १५ व्या शतकात प्रिन्स इलेक्टर अर्न्स्ट आणि त्याचा भाऊ आल्ब्रेख्त यांनी पोप कडे पत्र लिहून केक मध्ये लोणी वापरण्याची परवानगी मागितली. हे पत्र बटर लेटर म्हणून प्रसिद्ध आहे. त्यावेळी तेल महाग होते आणि सहजी उपलब्ध नसे म्हणून अशी परवानगी मागितली गेली तेव्हा पोपने फक्त त्यांच्याच कुटुंबाला अशी परवानगी दिली. अर्थात बाकी लोकांना काही रक्कम दंड म्हणून भरल्यावर अशी परवानगी मिळत असे. कालांतराने केक मध्ये लोणी वापरण्यास असलेली बंदी हटली तरी आजही स्टॉलेन केक अन्य केक इतका हलका नसतोच.

dandi
स्कॉटलंड मध्ये १९ व्या शतकात होऊन गेलेल्या मेरी क्वीन ऑफ स्कॉटलंडला चेरी आवडत नसत. त्यामुळे तिच्यासाठी खास डंडी केक बनविला जात असे. यात चेरीऐवजी बदाम वापरून सजावट केली जात असे. आज अनेक सुपरमार्केट मध्ये हा केक तुफान खपतो कारण बदामाची सजावट हेच त्याचे मुख्य आकर्षण असते. मात्र खास नाताळमध्येच हा केक बनविला जातो आणि नाताळची भेट म्हणून दिला जातो.