एटीएम सेवा महाग होत असल्यामुळे डिजीटल पद्धतीचा वापर करा – एसबीआय

state-bank-of-india
नवी दिल्ली – नुकताच खात्यावर सरासरी रक्कम ठेवणे एसबीआयने बंधनकारक केले असून एसबीआयचे व्यस्थापकीय संचालक पी.के. गुप्ता यांनी याबाबत बोलताना एटीएम सेवा महाग होत असल्यामुळे डिजीटल पद्धतीचा वापर करा, असा सल्ला ग्राहकांना दिला. विविध सेवांसाठी एसबीआय ग्राहकांकडून बँकिंग क्षेत्रात सर्वात कमी शुल्क आकारते, अशी त्यांनी माहिती दिली.

खात्यावर २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात सरासरी रक्कम ठेवली नसल्याने २ हजार ४३३ कोटी रुपये एसबीआयने ग्राहकांकडून वसूल केल्याची माहिती समोर आली. एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. गुप्ता यांनी या पार्श्वभूमीवर बँकिंग शुल्काबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, एटीएममधून पैसे काढणे, रक्कम जमा करणे यावर एसबीआयकडून शुल्क आकारले जाते. पण हे शुल्क ग्राहकांच्या हितासाठी कमी आकारले जाते.

खात्यावर सरासरी पैसे न ठेवल्यास एसबीआयने शुल्क लागू केले आहे. याबाबत विचारले असता गुप्ता यांनी सांगितले, की सुरक्षित बँकिंग सेवांसाठी तंत्रज्ञानाच्या अद्ययावतीकरणासाठी मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. तसेच ग्राहकांना सोयी व सुविधा देण्यासाठी देशभरात एटीमसह कॅश पॉईंटस सुरू करण्यात आली आहेत. त्यासाठीही एसबीआयने मोठी गुंतवणूक केली आहे.हा गुंतवणूकीवरील खर्च भरुन काढणे बँकेला आवश्यक आहे. त्यामुळे बँकेने सेवेचा दर्जा वाढविणे आणि सेवांचा विस्तार करण्यासाठी खात्यावर सरासरी रक्कम ठेवणे बंधनकारक केले आहे.

Leave a Comment