आज १० लाख खासगी आणि सरकारी बँक कर्मचारी संपावर

strike
नवी दिल्ली – आज देशभरातील तब्बल १० लाख बँक कर्मचारी एक दिवसीय लाक्षणिक संपावर असून बँक कर्मचाऱ्यांनी हा संप पगार वाढीची मागणी आणि तीन बँकांच्या विलिनीकरणाला विरोध करत पुकारला आहे.

याबाबत माहिती देताना बँक युनियनच्या वतीने अश्विनी राणा म्हणाले, आम्हाला इंडियन बँक असोसिएशनने ना बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँककेचे विलिनीकरण थांबविण्याचे आश्वासन दिले, ना बँक कर्मचाऱ्यांचे वेतन वाढविण्यासंदर्भात काही म्हटले असल्यामुळे आम्ही आज डिसेंबरला संपावर जात आहोत.

सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांसोबतच खासगी क्षेत्रातील बँक कर्मचारीही संपावर गेले आहेत. देना बँक, बँक ऑफ बडोदा आणि विजया बँक या राष्ट्रीयकृत बँका आहेत. नोव्हेंबर २०१७ पासून बँक कर्मचाऱ्यांची वेतन वृद्धी करण्यात यावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच इंडियन बँक असोसिएशनने बँक कर्मचाऱ्यांचे वेतन ८ टक्के वाढविण्याचा प्रस्ताव दिला आहे. पण बँक यूनियनने हा प्रस्ताव फेटाळला आहे. त्याचबरोबर बँकांच्या विलिनीकरणामुळे मोठ्या संख्येने बँक कर्मचाऱ्यांची छटनी होण्याचीही भीती वर्तवली जात आहे. केंद्र सरकारने यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियात असोसिएट बँकांच्या विलिनीकरणानंतर आणखी काही मोठ्या बँकांचे विलिनीकरण करण्याची घोषणा केली आहे.

Leave a Comment