चिनी कंपन्याचा आयफोनवर बहिष्कार

huawei
चिनी स्मार्टफोन कंपनी हुवावेच्या मुख्य वित्त अधिकारी मेंग वानझोऊ यांना अमेरिकेविरोधात वक्तव्य केल्याबद्दल कॅनडा येथे अटक करून तुरुंगात डांबण्याच्या निषेधार्थ चीन मधील अनेक कंपन्यांनी आयफोन वर बहिष्कार घातला असून काही कंपन्यांनी कर्मचार्यांनी आयफोन वापरल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली असल्याचे समजते. अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यानी हुवावेची उत्पादने खरेदी करण्यासाठी मोठी सवलत देऊ केली आहे.

सोशल मिडीयावर चीनमधील २० पेक्षा अधिक कंपन्यांनी हुवावे उत्पादन खरेदीसाठी कर्मचाऱ्यांना कोणत्या सवलती मिळतील त्याची माहिती दिली असून आयफोन वापरू नये अश्या सूचनाही दिल्या आहेत. शांघाय व्यापारी संघाने आयफोन वापरणाऱ्या कर्मचार्यांना नोकरीवरून काढले जाईल अशी सूचना दिली आहे. क्वालकॉमने अॅपलने त्यांच्या दोन पेटंटचे उल्लंघन केल्यासंदर्भात न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात न्यायाधीशांनी क्वालकॉमच्या बाजूने निकाल दिला असून अॅपल उत्पादने विक्री आणि आयातीवर बंदी घातली आहे.

Leave a Comment