मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर याने नाताळनिमित्त गरीब मुलांची देखभाल करणाऱ्या संस्थेला भेट देऊन तेथील मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. सचिन या ठिकाणी नाताळनिमित्त भेटी देणाऱ्या सँटाक्लॉजच्या वेशात गेला होता. सचिनने या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ त्याच्या ट्विटर अकौंटवर शेअर केला असून काही मिनिटात हा व्हिडीओ ५० हजाराहून अधिक लोकांनी पहिला आहे.
सँटा बनून सचिन खेळला गरीब मुलांसोबत क्रिकेट
या व्हिडीओ मध्ये सचिन सँटाक्लॉजच्या वेशात गाडीत बसताना आणि संस्थेतील मुलांबरोबर क्रिकेट खेळताना दिसत आहे. सचिनने सर्वाना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि आज गरीब मुलांची देखभाल करणाऱ्या संस्थेतील मुलांसोबत नाताळ साजरा करत आहे असे लिहिले आहे. विशेष म्हणजे सचिन येथे सँटाक्लॉजच्या वेशात पोहोचला तेव्हा त्याला प्रथम मुलांनी ओळखले नाही मात्र जेव्हा त्याने खोटी दाढी काढून टाकली तेव्हा मुलांनी सचिन सचिन असा एकच जल्लोष केला. जिंगल बेल गाण्याची धून वाजली आणि सचिनने मुलानाबरोबर क्रिकेट खेळण्यास सुरवात केली.