सरकारी संस्थेसाठी लोगोसह टॅग लाईन बनवा आणि जिंका २५ हजार

RBI
मुंबई – केंद्रीय वित्तीय शिक्षण केंद्रासाठी (एनसीएफई) लोगो व टॅगलाईन तयार करण्याचे आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेने केले आहे. निवडलेल्या लोगो व टॅगलाईनसाठी विजेत्याला २५ हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे.

वित्तीय नियमन करणाऱ्या आरबीआय, सेबी, आयआरडीए आणि पीएफआरडीए यांच्या सहकार्याने केंद्रीय वित्तीय शिक्षण केंद्र ही संस्था स्थापन झाली आहे. एनसीएफई गरीब आणि दुर्बल गटातील लोकांना आर्थिक समावेशकतेमध्ये घेण्यासाठी व आर्थिक साक्षरतेसाठी कार्यरत आहे. सोशल मीडिया कँपेन, प्रिंट माध्यम आणि ऑफिस स्टेशनरीमध्ये निवडण्यात आलेला लोगोचा वापर केला जाणार आहे. [email protected] या ई-मेलवर नागरिकांना लोगो व टॅगलाईन पाठवायचे आहेत. ncfe.org.in या वेबसाईटवर अधिक माहिती उपलब्ध आहे. लोगो व टॅगलाईन पाठविण्याची अंतिम मुदत ३० जानेवारी २०१९ आहे. यापूर्वीही केंद्र सरकारने काही संस्थांचे लोगो नागरिकातूनच मागवून निवडलेल्या लोगोकरिता बक्षीस दिले आहे.

Leave a Comment