ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत धोनीचे पुनरागमन

mahendra-singh-dhoni
मुंबई – ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पुढील वर्षी १२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे या संघात पुनरागमन झाले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी धोनीचे पुनरागमन झाले आहे. धोनीबरोबर केदार जाधव आणि हार्दिक पांड्याचे देखील पुनरागमन झाले आहे.

धोनीला याआधी झालेल्या वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघात जागा मिळाली नव्हती. १२ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका सिडनीमधून सुरू होईल. दुसरा सामना १५ जानेवारी (ऍडलेड), तिसरा सामना १८ जानेवारी (मेलबर्न) मध्ये होईल. यानंतर न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ ५ एकदिवसीय मालिका खेळेल. २३ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत एकदिवसीय मालिका होईल. तर ६, ८ आणि १० फेब्रुवारीला ३ टी-२० सामन्यांची मालिका होईल. भारतीय संघात विश्वचषकापर्यंत कोणतेही प्रयोग होणार नसल्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी याआधीच सांगितले होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, मोहम्मद शमी.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद.

Leave a Comment