भारतीय संघाचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करू शकतो अजिंक्य रहाणे – मिचेल जॉन्सन

trio
मेलबर्न – ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनबरोबर दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान झालेल्या राड्यानंतर विराटच्या वर्तनाबाबत कर्णधार म्हणून नाराजी व्यक्त करत मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. यात आता ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनचाही समावेश झाला आहे. जॉन्सनच्या मते, भारतीय संघाचे अजिंक्य रहाणे चांगल्या प्रकारे नेतृत्व करू शकतो. जॉन्सनने रहाणेची तोंडभरुन स्तुती करत अनेक गोष्टींमध्ये विराट कोहलीपेक्षा रहाणे हा जास्त प्रभावी असल्याचे म्हटले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे रहाणे योग्य पद्धतीने नेतृत्व करु शकतो. ती क्षमता रहाणेकडे असून आवश्यक असणारी खिलाडूवृत्ती त्याच्याकडे आहे. तसेच नवख्या खेळाडूंसाठी तो एक योग्य आदर्श बनू शकतो, असे मत जॉन्सनने आपल्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरुन मांडले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांनी मालिकेत १-१ सामना जिंकून बरोबरी साधली आहे.

Leave a Comment