शाओमी मी प्लेने लाँच होताच केला जागतिक विक्रम

miplay
चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने त्यांचा मी प्ले स्मार्टफोन लाँच होताच जागतिक विक्रम नोंदविला असून गिनीज बुक मध्ये या विक्रमाची नोंद केली गेली आहे. स्थानिक बाजारात हा फोन लाँच होताच पहिल्याच दिवशी जगातील सर्वात मोठे डायनामिक पझल बनविण्याचे रेकॉर्ड नावावर केले आहे. त्यासाठी १००८ मी प्ले फोन वापरून ७.९ मीटर उंचीचे ख्रिसमस ट्री तयार केले गेले. पूर्वी हे रेकॉर्ड ५०४ फोनचा वापर करून बनलेल्या डायनामिक पझलच्या नावावर होते.

मी प्लेवर हे क्रिसमस ट्री बनविण्याची तयारी दोन आठवडे अगोदर सुरु झाली होती. या टीमने पहाटे ४ वा. ट्री बनविण्यास सुरवात केली आणि दुपारी चार वा. हे काम पूर्ण झाले. या फोनसोबत कंपनी १ वर्षासाठी १० जीबी इंटरनेट डेटा मोफत देणार आहे.

या फोनला ५.८४ इंची फुल एचडी स्क्रीन, ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज, ३००० एमएच बॅटरी, १२ व २ एमपीचे रिअर कॅमेरे, ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला असून त्याची किंमत १०९९ युआन म्हणजे ११,१०० रुपये आहे.