शहीद जवानांना अनोखा सन्मान देणारा अभिषेक

tattoo
भारतीय सेना हा भारतीय जनतेचा अभिमानाचा आणि गौरवाचा विषय आहे. सेनेतील जवान हा नेहमीच अभिमानाचा विषय असला तरी शहीद जवानांना सन्मान देण्यासाठी काही करणारे लोक फार नाहीत. गाजियाबाद मधील अभिषेक गौतम यांनी मात्र शहीद जवानांना अनोख्या रीतीने सन्मान दिला आहे. अभिषेक यांनी शरीरावर कारगिल युद्धात शहीद झालेल्या ५८० जवानांची नावे कोरून घेतली आहेत. शिवाय बाईकवर देशभर फिरून ते या जवानांच्या कुटुंबियांना भेटत आहेत.

इतकेच नाही तर अभिषेक यांनी शरीरावर देशाच्या स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान दिलेल्या महापुरुषांचे टॅटू काढले आहेत. त्यात भगतसिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रताप, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी अशा ११ व्यक्तींचा समावेश आहे. त्यांनी इंडिया गेटचाही टॅटू गोंदवून घेतला आहे.

आसपासच्या भागात अभिषेक गौतम यांना चालते फिरते वॉर मेमोरियल म्हणून ओळखले जाते.

Leave a Comment