या महिनाअखेर होणार विजया, देनासह बँक ऑफ बडोदाचे विलिनीकरण

bank
नवी दिल्ली – बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सरकारी बँकांच्या विलिनीकरणाला विरोध करत संप सुरू केला असून असे असतानाच या महिनाअखेर विजया बँक, देना बँक आणि बँक ऑफ बडोदाची विलिनीकरण प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

८ जानेवारीला संसदेचे अधिवेशन सुरू होत असून बँकांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया त्यापूर्वी पार करणे सरकारला आवश्यक आहे. विलिनीकरण्याच्या प्रक्रियेचे तीनही बँकांच्या संचालक मंडळाकडून कठोर परीक्षण होणार आहे. यामध्ये विलिनीकरण होताना बँकांच्या शेअरचा हिस्सा आणि लागणारे भांडवल याचा अभ्यास संचालक मंडळ करणार आहे. तीनही बँकांचे विलिनीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने भांडवल देण्याचे आश्वासन दिले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जागतिकस्तरावरील बळकट आणि मोठी बँक करण्यासाठी सप्टेंबरमध्ये तीनही बँकाच्या विलिनीकरणाचा निर्णय घेतला. सरकारी बँकांचा एनपीए वाढल्याने अर्थव्यवस्थेवर बोजा निर्माण होत आहे. आरबीआयने वित्तीय शिस्त लागण्यासाठी विविध सरकारी बँकावर आकृतीबंध लागू करुन कार्यवाही केली आहे.

Leave a Comment