महाराष्ट्रासह सात राज्यातील जिओ ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता

Jio
कोलकाता – जर रिलायन्स कम्युनिकेशन्सकडून स्पेक्ट्रम रिलायन्स जिओ इन्फोकॉमने खरेदी केली नाही तर जिओच्या दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह सात राज्यातील ग्राहकांना फटका बसू शकतो. या ग्राहकांना जिओची सेवा मिळविण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती टेलिकॉम सेक्टरमधील तज्ज्ञांनी वर्तवली आहे. याबाबतचे वृत्त एका हिंदी वृत्तपत्राने दिले आहे.

800 मेगाहर्ट्ज बँड पाच युनिट्सवर आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूसह काही राज्यात अवलंबून आहे. जिओ स्पेक्ट्रम ब्लॉकसाठी आरकॉमवर अवलंबून आहे. 4 जी एलटीई सेवेसाठी हा बँड खूप महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक सर्कलमध्ये यातून जिओकडे 800 मेगाहर्ट्झ बँडमध्ये 4जी एअरवेव्सच्या 3.8 युनिट्स आहेत. एलटीई कव्हरेजसाठी या बँडमध्ये आरकॉमच्या स्पेक्ट्रमवर अवलंबून आहे.

याबाबत रोहन धमीजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकर स्पेक्ट्रम ट्रेडिंग डील स्पष्ट होणे जिओसाठी अत्यंत गरजेचे आहे. कारण जिओला या डीलनंतर आरकॉम 4जी स्पेक्ट्रम मिळेल. जिओला ही डील झाल्यास 800 मेगाहर्ट्ज बँडमध्ये कंटिगुअस ब्लॉक्स बनवण्यासाठी मदत मिळेल. स्पेक्ट्रम ट्रेडिंग करारावर 2017 मध्ये स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. आरकॉम 4जी एअरवेव्सची 112.4 युनिट्स या कराराला मंजुरी मिळाल्यानंतर जिओला विकण्यात आली होती. यातून 800 मेगाहर्ट्ज बँड एलटीई स्पेक्ट्रमचाही समावेश होता.

सिस्टेमा श्याम टेलिसर्विसेसजकडून आरकॉमने खरेदी केली होती. 46,000 कोटींचे कर्ज आरकॉमवर आहे. आरकॉमला हा स्पेक्ट्रम विकल्यानंतर 18,000 कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी मदत होईल. ही डील आरकॉम आणि जिओ या दोन्हींसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. हा स्पेक्ट्रम जर मिळाला नाही तर जिओ मुंबई, गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, ओडिशा, आसामसह पूर्वीकडील राज्यातील ग्राहकांच्या सेवेला फटका बसण्याची शक्यता आहे.

Leave a Comment