जपानचा हिताचीची एसबीआय पेमेंट सेवेत २६ टक्के भागीदारी

state-bank-of-india
नवी दिल्ली – एसबीआय पेमेंट सेवेत जपानच्या हिताचीने २६ टक्के भागीदारी घेतली असून भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) या संयुक्त भागीदारीला मान्यता दिली आहे.

ऑक्टोबरमध्ये संयुक्त भागीदारीचा करार देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय आणि हिताची पेमेंट सेवा यांनी केला आहे. एसबीआय व हिताचीला या करारातून दोन्ही पेमेंट सेवांकरिता कार्ड स्वीकारणे आणि डिजीटल पेमेंटचे माध्यम वापरता येणार आहे. सीसीआयने या कराराला मान्यता दिल्याचे ट्विट केले आहे. दोन्ही संयुक्त भागीदारीत एसबीआय सर्वात अधिक हिस्सा आहे. ग्राहकांसह व्यापाऱ्यांना व ई-कॉमर्स व्यावसायिकांना या सेवेतेून सुविधा मिळणार आहेत.

Leave a Comment