वैष्णोदेवी-भैरवघाटी केबल कार सेवा सुरु

bhairo-
हिमालयाच्या कुशीतील माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणारया भाविकांना २५ डिसेंबरपासून यात्रा पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. वैष्णोदेवी ते भैरव घाटी येथे जाण्यासाठी आता केबल कार सेवा सुरु केली जात आहे. वैष्णोदेवी पासून भैरवघाटीला जाण्यासाठी साडेतीन किमीची खडी चढण असलेला खडतर मार्ग यात्रेकरूना पार करावा लागत होता. त्यासाठी हि सुविधा दिली गेली आहे. वैष्णोदेवीला जाणाऱ्यांनी भैरवघाटीचे दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण झाली असे मानले जात नाही.

आजारी, वृद्ध आणि अपंग लोकांना प्राधान्याने या केबल सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी १०० रु. भाडे आकारले जाणार आहे. २०१४ साली केबल कारचे काम सुरु करण्यात आले होते. स्वित्झर्लंडची गर्वेंटा एजी कंपनी आणि दामोदर रोपवे यांनी संयुक्तपणे हे काम केले असून त्यासाठी ७५ कोटी रु. खर्च आला आहे. वैष्णोदेवी श्राईन बोर्डने यासाठी पुढाकार घेतला होता.

Leave a Comment