टीम ऑस्ट्रेलियातील ७ वर्षाच्या लेग स्पिनरला हवी विराटची विकेट

archi
ऑस्ट्रेलियातील ७ वर्षाचा क्रिकेटवेडा अर्ची शिलर याचे ऑस्ट्रेलिया टीमची कप्तानी करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे. भारताविरुद्ध मेलबोर्न येथे २६ डिसेंबरपासून खेळल्या जात असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी मध्ये तो कप्तान टीम पेन सह संघाचा सहकप्तान बनला आहे. या निमित्ताने अर्चीला जणू नाताळाची भेट मिळाली आहे.

अर्ची या ७ वर्षाच्या मुलाला हृदयरोग आहे. त्याच्या हृदयाच्या झडपा नीट काम करत नाहीत. त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तो लेग स्पिनर आहे आणि ऑस्ट्रेलिया टीमचा कप्तान होणे हे त्याचे स्वप्न होते. ऑस्ट्रेलियातील मेक अ विष संस्थेमुळे त्याचे हे स्वप्न साकार झाले आहे. शनिवारी त्याचा ७ वा वाढदिवस होता तेव्हाच त्याला हि बातमी दिली गेली. ऑस्ट्रेलियाचा कप्तान टीम पेन म्हणाला आज अर्ची आमच्यासोबत आहे याचा खूप आनंद वाटतो. विशेष म्हणजे अर्चिला विराट कोहलीची विकेट काढायची आहे.

Leave a Comment