वाहतूक कोंडीमुळे मारुती गुरुग्रामला ठोकणार रामराम

maruti
भारतातील बडी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी गुरूग्राम येथील प्रकल्प हलविण्याच्या तयारीत असून हरियानात हा प्रकल्प नेला जाणार असल्याचे समजते. त्यासाठी ७०० एकर जागेचा शोध सुरु आहे. विशेष म्हणजे याच प्रकल्पात १९८३ मध्ये भारतातील पहिली मारुती ८०० कार तयार केली गेली होती.

कंपनीचे सीइओ ने केनीची आयुकावा म्हणाले, हरियाना आमचे मदर स्टेट आहे. तेथे आमच्याकडे ७०० एकर जागा असून तेथे हा प्रकल्प हलविण्यासंदर्भात हरियाना सरकारशी बोलणी सुरु आहेत. आमचे सप्लायर तेथे मोठ्या प्रमाणावर आहेत. गुरुग्राम मध्ये वाहतूक समस्या वाढली आहे. त्यामुळे कच्चा माल आणणे आणि तयार माल बाहेर पाठविणे यात बराच वेळ खर्ची पडतो आहे. परिणामी येथून प्रकल्प हलविण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

Leave a Comment