तुर्कस्तानानातील ६०० वर्षे जुनी ऐतिहासिक इयुबी मशीद तंत्रज्ञानाच्या चमत्काराने एका जागेवरून दोन किमी दूर असलेल्या दुसऱ्या जागी यशस्वीपणे हलविली गेली. हसनफेक या ऐतिहासिक शहरातील हि मशीद १५ व्या शतकात बांधली गेली होती. या जागेवर देशातील चार नंबरचे मोठे धरण बांधले जाणार आहे आणि धरणामुळे हि मशीद पाण्यात बुडणार होती. मशीद वाचविण्यासाठी ती हलविण्याचा निर्णय घेतला गेला होता. इंजिनिअरिंगच्या चमत्काराने हे साध्य करण्यात आले.
तंत्रज्ञानाच्या चमत्काराने हलविली गेली प्राचीन मशीद
मिळालेल्या माहितीनुसार या मशिदीचे वजन ४६०० टन होते. त्यामुळे तीन भागात ती तोडून रोबोंच्या सहाय्याने ती २ किमी दूर असलेल्या एका पार्क मध्ये हलविली गेली. हे मोठे आव्हान होते आणि ते यशस्वीरित्या पेलले गेले. हि मशीद ९ संस्कृतींची साक्षी होती. हसनफेक या शहराला संरक्षित शहराचा दर्जा दिला गेला असून येथे ६ हजार गुफा आणि प्राचीन किल्ला आहे. हे शहर २ हजार वर्षे जुने असल्याचे पुरावे दिले जातात.